Breaking News

शिवसेनेच्या माजी नगरसेवकाचा मृतदेह आढळला




नाशिक, दि. 17 - शिवसेनेचे माजी नगरसेवक व विद्यमान भाजपा नगरसेविका ज्योती गांगुर्डे यांचे पती अर्जून गांगुर्डे यांचा मृतदेह आढळून आल्यामूळे एकच खळबळ डडाली आहे. शनिवारी पहाटे गाडीमध्ये त्यांचा मृतदेह आढळल्यानंतर ही घटना समोर आली. पेठरोडवरील इंद्रप्रस्थनगरी समोरील मेघराज बेकरीमागे असलेल्या मोकळ्या पटांगणात एका गाडीत हा मृतदेह आढळून आला. अर्जून गांगुर्डेंची हत्या करण्यात आली की आत्महत्या केली हे अद्याप स्पष्ट होऊ शकलेलं नाही. पोलीस अधिक तपास करत आहेत.