Breaking News

गावठी कट्टे विकताना सराईत गुन्हेगार जेरबंद

निगडी, दि. 07 -  निगडीतील भक्ती-शक्ती  चौकातील अण्णाभाऊ साठे पुतळ्याजवळ  गावठी कट्टे विकताना सराईत  गुन्हेगारास निगडी पोलिसांकडून आज (दि.15) जेरबंद करण्यात आले आहे. त्याच्याकडून तीन गावठी कट्टे व पाच जिवंत काडतुसे यासह चार लाखांचा ऐवज ताब्यात घेण्यात आला आहे. 
अनिकेत जाधव ( रा. जाधववस्ती, रावेत), असे अटक करण्यात आलेल्याचे नाव असून, त्याच्यावर जबरी चोरी, दरोडा शस्त्र विक्री आदी गंभीर गुन्ह्याची नोंद आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, निगडीतील भक्ती-शक्ती  चौक येथे अण्णाभाऊ साठे पुतळ्याजवळ गावठी कट्टे विकणार असल्याची माहिती निगडी पोलिसांच्या डी.बी.पथकातील संदीप पाटील यांना खबर्‍यांमार्फत मिळाली होती. त्यानुसार, सापळा रचला असता एम.एच.02 ए.व्ही.3229 या फोर्ड आयकॉन गाडीतील डिक्कीत एक गावठी कट्टा आढळला.  गाडीची तपासणी केली असता त्याच्याकडे तीन गावठी कट्टे व पाच जिवंत काडतुसे सापडली. सदर गुन्हेगाराची तपासणी केली असता तो सराईत गुन्हेगार अनिकेत जाधव असल्याचे कळाले. त्याच्यावर जबरी चोरी, दरोडा, बेकायदेशीर शस्त्र विक्री आदी गंभीर गुन्ह्याचा नोंद असल्याचे समजले.
दरम्यान, त्याच्याकडून  एम.एच.02 ए.व्ही.3229 या फोर्ड आयकॉन या रुपये तीन लाख किमतीच्या गाडीसह 3 लाख 75 हजार रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.
ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजयकुमार पळसुले यांच्यासह पोलीस निरीक्षक संतोष गोरे, मंगेश गायकवाड, विकास शिर्के यांनी केली.