पुणे जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यात 17 वाहनचोरीचे दाखल गुन्हे उघड
पुणे, दि. 17 - पुणे जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यात दुचाकी व चारचाकींचे तब्बल 17 पर्यंत गुन्हे दाखल असलेल्या दोन अट्टल वाह्नाचोराना जेजुरी पोलीस ठाण्याच्या दोन कर्मचार्यांनी शिताफीने जेरबंद केले. त्यांचेकडून मार्च महिन्यात वाल्हे गावातून चोरलेले पिकअप जिप वाहन हस्तगत करण्यात आले आहे जेजुरी पोलीस ठाण्याअंतर्गत असलेल्या वाल्हे औट पोष्ट येथे कार्यरत असलेल्या पोलीस हवालदार श्रीरंग निगडे आणि संदीप पवार यांनी केलेल्या तपास आणि कामगिरीबद्दल त्यांचे वरिष्ठांकडून कौतुक होत आहे. सोमनाथ सुभाष चौधरी वय -28 ,रा. भेकाराईनगर (फुरसुंगी )संदीप पांडुरंग मेमाणे वय -23, रा.पारगावमेमाणे (ता.पुरंदर )अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.
त्यांचेकडून चोरण्यात आलेले पिकअपवाहन हस्तगत करण्यात आले असून इतर ठिकाणच्या चोरीतील दुचाकी व चारचाकी वाहनांचे गुन्हे उघड होण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.
याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की,संतोष कृष्णात गायकवाड रा.वाल्हे यांची महिंद्रा कंपनीचे पिकअपजिप (क्र.एम.एच.12 सी.एच.4880) हे वाहन 29 मार्च 2016 रोजी जेजुरी-नीरा रस्त्यावरून रात्रीच्या सुमारास चोरीला गेले होते त्याची नोंद पोलीस ठाण्यांत करण्यात आली होती.
सदरील गुन्ह्याचा तपास करताना या वाहनाची बौडी-रंग बदलून व बोगस नंबर टाकून संबंधित आरोपी हे वाहन वापरत असल्याची माहिती एका माहितीदाराने पोलिसांना दिली. आणि त्यानंतर सापळा रचून वाहनासह दोन आरोपींना जेरबंद करण्यात आले.
त्यांचेकडे चौकशी केली असता नीरा येथून तीन महिन्यांपूर्वी चोरलेली एक पिकअप वाहन उरुळीदेवाची येथे बेवारस स्थितीमध्ये सोडून दिले होते अशी माहिती मिळाल. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक रामदास वाकोडे करीत आहेत .