मुसळधार पावसाने गोदावरी पात्रात पाणी
गंगाखेड/प्रतिनिधी: सर्वञ होत आसलेल्या मुसळधार पावसामुळे तब्बल पाच वर्षा नंतर गोदावरी पाञात पाणी आले.हे पाणी पाहाण्यासाठी नागरिकांनी एकच गर्दी केली. दक्षिण गंगा म्हणून प्रसिद्ध आसलेल्या गोदावरी गंगा मागिल पाच वर्षा पासुन कोरडी होती यामुळे प्रचंड प्रमाणात वाळू उपसा झाला याचा परीणाम पाणी टंचाई मध्ये झाला.सन 2010 मध्ये गोदावरी ला पुर आला होता त्यानंतर गोदावरी चे पाञ कोरडे ठणठणीत झाले होते.मागील चार दिवसा पासुन होत आसलेल्या मुसळधार पावसा मुळे गोदावरी पाञात पाणी आले गणपती विसर्जना दिवसीच पाञातील वरील भागात पाणी होते राञीचा पावसामुळे प्रमच गोदावरी पाञ वाहू लागले.पाणी पाहाणासाठी नागरिकांनी गोदावरी पाञाजवळ एकच गर्दी केली.