दोन दिवसात 220 मिलीमिटर पावसाची नोंद
। जनजीवन विस्कळीत । कौतुका नदी च्या पुरामुळे संपर्क तुटला । वाहने अडकली
जामखेड (प्रतिनिधी)। 17 - जामखेडसह तालूक्यात गेल्या दोन दिवसात 220 मिलीमिटर पाऊस झाला आहे.खर्डा शहर व परिसरात मोठया प्रमाणात पाऊस झाल्याने सर्व वाहतूक ठप्प झाली होती. तसेच खर्डा येथील कौतूका नदी दुथडी भरून वाहत होती. या पावसामुळे तालूक्यातील मोहरी ,धोंडपारगांव ,हे तलाव पुर्ण क्षमतेने भरले आहेत. व तालूक्यातील इतर तलावामध्ये मोठया प्रमाणात पाणीसाठा साचला आहे. जामखेड तालुक्यातील खर्डा पसिरात 15 सप्टेबर रोजी पहाटे जोरदार पडलेल्या पावसामुळे नदी, नाले दुधडी भरून वाहिले तर अनेक गावांचा संपर्क तुटल्याने एस. टी. सह अनेक खाजगी प्रवासी वाहने पैलतिरावर अनेक तास अडकुन पडले. खर्डा शहराच्यामधुन कौतूका नदी दुधडी वाहीली आहे. शहराच्या . शुक्रवारपेठ , ऐतिहासिक ओंकारेश्वर मंदीर, बारव निंबाळकर राजांची छत्री समाधी, ग्रामदैवत कानिफनाथ सह लोकवस्ती आहे. कौतुका नदीवरील पुल ऐतिहासिक जूना दगडी पुल आहे जूना दगडीपुल या पावसामुळे नादुरूस्त झाला असुन येथील नागरिकांना जाता देखील येत नाही. त्यामुळे या पुलाचे दुरूस्ती करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे पहिल्या पावसात पाणी गेल्यामुळे दोन तीन तास शुक्रवार पेठेत ग्रामस्थांचा संपर्क तुटला पुलावरून पाणी जात असल्यामुळे पाण्यातून जिवघेणा प्रवास करताना ग्रामस्थ, विदयार्थी दिसून आले तसेच दरडवाडी येथील चव्हाण वस्ती वरील नागरिक खर नदीवरून नदीत दोर टाकून पैलतीरावर प्रवास करतात मराठवाडयातून दिघेाळ जातेगांव मार्गे पश्चिम महाराष्ट्र प्रवास केल्यावर मोहरी गावाजवळील दोन नाल्यांना पाणी आल्यामुळे एस. टी.सह प्रवास करणार्या वाहणांना दोन ते तीन तास प्रतिक्षा करत रस्त्यावर उभे राहावे लागले.पावसामुळे शेतातील उडीद, मुग, बाजरी, सोयबीन, आदी पिकासह खर्डा शहरातील अनेक घरांची पड-झड होवून नुकसान झाले या पावसामुळे तालूक्यातील खर्डा 51, नान्नज 63,जामखेड 54,नायगांव 44, आरणगांव 08.3 असे एकुण 220 मिलीमिटर एव-सजया पाऊस झाला आहे. तसेच तालूक्यातील खैरी मध्यम प्रकल्प 39. ,मोहरी 100 ,भुतवडा 64 ,धोंडपांरगांव 113 ,धोत्री 84 ,जवळका 66,रत्नापूर 17 ,नायगावं 07, तेलंगशी 6, पिंपळगांव 6 या तलावामध्ये मोठा पाणी साठा वाढला आहे.