पदविधरांच्या हक्कासाठी लढा देणार ः जैन
बुलडाणा :
राष्ट्रमाता माँ जिजाऊ यांच्या जन्मस्थळी नतमस्तक होत सामाजिक कार्यकर्ते जितेंद्र एन. जैन यानी अमरावती पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीसाठी आज दिनांक 13 सप्टेंबर रोजी उमेदवार म्हणुन प्रचाराचे नारळ फोडले. गेल्या 20 वर्षापासून सामाजिक जीवनात वावरत असताना निष्काम सेवा व्रत अंगीकारले आहे. राजकारण हा आपला पिंड नाही, परंतु या मतदार संघाच्या माध्यमातून अनेकांना न्याय देता येवू शकतो त्यामुळे पदविधरांच्या न्याय हक्कासाठी या लढ्यात उतरन्याचा निर्धार पक्का केल्याचे जितेंद्र एन. जैन यांनी यावेळी सांगितले.
आपल्या कोअर कमिटीसह जितेंद्र एन. जैन यांनी आज दुपारी सिंदखेडराजा गाठले. राजे लखुजी जाधव यांच्या राजवाड्यात माँ जिजाऊंच्या जन्मस्थळी बालशिवबासह माँ जिजाऊंचे दर्शन घेतले. आणि प्रचाराचा नारळ देखील फोडला. महाराष्ट्र इंजिनियर असोशिएशिनच्या माध्यमातून हजारो अिायंत्याना रोजगार मिळवून दिल्याचे सांगत जितेंद्र एन. जैन यांनी शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबाना स्वािामानाने जगन्याचे आत्मबळ मिळण्यासाठी सामाजिक कामातुन उभारी दिली. आत्महत्या ग्रस्त पाल्यांचा 5 वी ते 12 वी मोफत शिक्षणाची सोय करण्यासाठी पुढाकार घेतला. आज शेकडे मूले पुणे इथे शिक्षण घेत आहेत. सामाजिक काम हीच आपली ओळख आहे. पदवीधर मतदार संघात राजकारण पेक्षाही समाजकारणाची मोठी संधी असून अनेकांच्या पाठबळाने ही निवडणूक जिंकने सोपी जाईल. बुलडाणा, वाशीम, अकोला, अमरावती व यवतमाळ या पाच ही जिल्ह्यात आपले काम सुरु झाले आहे. बी. टी. देशमुख यांच्या सारख्या लढवैया नेत्यांच्या व शिक्षक आमदार श्रीकांत देशपांडे यांचा आदर्श आपल्यासोमोर आहे. त्यामुळे निषितच बेरोजगार पदविधरांसाठी आपला लढा सुरूच राहील असेही यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांना बोलताना ते म्हणाले. यावेळी ललित कोठारी, हिरासिंग धोती, श्याम मिटकरी, संतोष चांडक, धीरज गोठी, राजेन्द्र नरोटे, प्रा. निशिकांत ढवले, मनसुख बाफना, जाहिर खान, सुखदेव नरोटे, राजेश इंगळे, प्रदीप हिवले यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांची उपस्थिति होती.
