अपघातग्रस्तासाठी मोफत प्लास्टिक सर्जरी शिबीराचे आयोजन
खामगांव (प्रतिनिधी) ः दरवर्षी प्रमाणे स्थानिक लॉयन्स क्लब ऑफ खामगांव सिल्व्हर सिटी, जिल्हा सामान्य रुग्णालय व बुलडाणा जिल्हा केमिस्ट अॅन्ड ड्रगीस्ट असो. यांच्या संयुक्त विद्यमाने जळालेल्या व अपघातग्रस्त रुग्णांसाठी मोफत प्लास्टिक सर्जरीचे आयोजन 16 ते 18 सप्टेंबर 2016 दरम्यान करण्यात आले आहे. येथील सामान्य रुग्णालयात होणार्या या शिबीरात जळालेल्या व अपघातामुळे व्यंग निर्माण झालेल्या रुग्णांवर मोफत उपचार करण्यात येणार आहेत. या शिबीराचे उद्घाटन 16 सप्टेंबर 2016 रोजी दुपारी 2 वाजता सामान्य रुग्णालय खामगांव येथे होणार आहे. ज्या रुग्णांची तपासणी 16 तारखेला होईल त्याच रुग्णांची शस्त्रक्रिया 17 व 18 सप्टेंबरला करण्यात येईल. ज्यांना या शिबीराचा लाभ घ्यावयाचा आहे त्यांनी 16 सप्टेंबरला आपली नावे नोंदवावीत.
सदर शिबीरासाठी हिंदुजा हॉस्पीटल मुंबईचे सुप्रसिध्द प्लास्टीक सर्जन डॉ.शंकर श्रीनिवासन हे लाभणार आहे. तर खामगांव येथील डॉ.निलेश टिबडेवाल, डॉ.भगतसिंग राजपुत, डॉ.गौरव गोयनका आदि तज्ञ डॉक्टर हे त्यांना सहकार्य करणार आहेत. तसेच सामान्य रुग्णाल खामगांव चे वैद्यकीय अधिक्षक डॉ.सुरेश सिरसाट व त्यांचे सहकारी शिबीराच्या यशस्वीतेसाठी प्रयत्नरत आहेत. तसेच बुलडाणा जिल्हा केमिस्ट असोसिएशनचे अनिल नावंदर तसेच असोसिएशनचे सर्व पदाधिकारी यांचे योगदान लाभणार आहे. तरी गरजुंनी सदर शिबीराचा लाभ घ्यावा असे आवाहन लॉयन्स क्लब ऑफ खामगांव सिल्व्हर सिटी चे अध्यक्ष संतोष सुराणा तसेच सेके्रटरी तुषार शहा, कोषाध्यक्ष हरिओम राठी यांच्यासह कार्यकारिणी सदस्यांनी केले आहे.
