सिंगूरच्या शेतकर्यांना नुकसान भरपाईचे धनादेश वाटप
सिंगूर : पश्चिम बंगालच्या सिंगूर येथे असंतुष्ट शेतकर्यांना पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी 800 शेतकर्यांना नुकसान भरपाई म्हणून धनादेशाचे वाटप केले. त्याचबरोबर 9 हजार 117 नागरिकांना जमीनीचे मालकी हक्क देण्यात येईल, अशी माहिती तृणमूल काँग्रेसच्या वतीने ट्विटद्वारे देण्यात आली. टाटा मोटर्सचा ‘नॅनो’ प्रकल्प सुरू करण्यासाठी डाव्या आघाडी सरकारकडून करण्यात आलेली जमीन संपादन प्रक्रिया बेकायदेशीर होती, असा निकाल सर्वोच्च न्यायालयाने अलीकडेच दिला आहे . त्याचबरोबर 997.17 एकर जमीन मालकांना परत करण्याचा आदेश राज्य सरकारला दिला होता.
