भोंदूबाबापासून सावध राहा : शहाजी भोसले
औरंगाबाद : धर्माचा सहारा घेवून वाढत असलेल्या अंधश्रध्देला खतपाणी घालणार्या भोंदू बाबापासून सावध राहण्याचे आवाहन अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे शहाजी भोसले यांनी केले.जानकी देवी बजाज ग्रामविकास संस्थेअंतर्गत समाजसेवा केंद्राच्या वतीने वडगाव (को.) येथे अंधश्रद्धा निर्मुलन कार्यक्रमाचे आयोजन शुक्रवार 16 (सप्टेंबर) रोजी आनंद बुद्ध विहार येथे करण्यात आले होते. यावेळी भोसले यांनी जिभेत त्रिशुल टोचणे, हात चालाखी करून हवेतन सोन्याच्या साखळी, पैशाचा पाऊस पाडणे आदी प्रयोग करून बुवा बाजी व चमत्कार करणारे बाबा कसे ढोंगी असतात हे पटवून दिले. श्रद्धा व अंधश्रद्धा यातील फरक पटवून दिला. यावेळी समाज सेवा केंद्राच्या समन्वय सुनिता तगारे यांनी मार्गदर्शन केले.