Breaking News

आपले पोलीस विशेषांकाचे प्रकाशन

 अहमदनगर (प्रतिनिधी) । 17 - महाराष्ट्र शासनाचे मुखपत्र असलेल्या लोकराज्य मासिकाच्या ’आपले पोलीस’ या विशेषांकाचे जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. सौरभ त्रिपाठी यांच्या हस्ते प्रकाशन झाले. यावेळी प्रेस क्लबचे अध्यक्ष मन्सूर शेख, जिल्हा माहिती अधिकारी राजेंद्र सरग, ज्येष्ठ पत्रकार महेश देशपांडे महाराज, सागर शिन्दे, फ.स. पठाण आदी उपस्थित होते.
डॉ. त्रिपाठी म्हणाले, महाराष्ट्र पोलीस दल जनतेच्या सेवेत कार्यरत असते. या पोलीस दलामध्ये अत्याधुनिक साधन सामग्रीचा वापर केला जात आहे.  सायबर क्राईम सेल, पोलीस सेवा ऑनलाईन, फिरते न्यायसहायक वैज्ञानिक पथक आदींची माहिती या लोकराज्य मध्ये देण्यात आलेली आहे. शासन आणि जनतेमध्ये सुसंवाद निर्माण करण्याचा हा प्रयत्न आहे. या अंकामुळे लोकांच्या मनातील पोलिसांविषयी असलेला गैरसमज दूर होण्यास मदत होईल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली. लोकराज्य मासिक अधिकाधिक लोकापर्यंत जावे, असे ते म्हणाले.
 ज्येष्ठ पत्रकार महेश देशपांडे यांनीही लोकराज्य विशेषांकाचे कौतुक करुन पोलीस दलात भरती होऊ इच्छिणा-यांसाठी तसेच स्पर्धा परीक्षेची तयारी करणा-या सर्वांसाठी हा अंक उपयुक्त ठरेल, असे सांगून हा अंक प्रत्येकाने वाचावा व आपल्या संग्रही ठेवावा, असे आवाहन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा माहिती अधिकारी राजेंद्र सरग यांनी केले.