Breaking News

ऑक्टोबरमध्ये बँकांना 11 दिवस सुट्ट्या!

मुंबई, दि. 30 - ऑक्टोबर महिन्यात दसरा, दिवाळी या सणांच्या पार्श्‍वभूमीवर बँका अकरा दिवस बंद राहणार आहेत. ऐन सणासुदीच्या काळात बँकांना सुटट्या  असल्यामुळे आर्थिक व्यवहारांवर परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे ग्राहकांना आत्ताच नियोजनपूर्वक आर्थिक व्यवहार करावा लागणार आहे.
ऑक्टोबरमधील पाच रविवार (2,9,16,23 आणि 30) तसेच दुसरा आणि चौथा शनिवार (8 आणि 22 ऑक्टोबर) या दिवशीही बँका बंद राहणार आहेत.  दिवाळी आणि दसर्‍याच्या मुहूर्तावर खरेदी करणार्‍यांनी आत्ताच आर्थिक नियोजन करणे बंद आहे.