Breaking News

हिंगोलीत मराठा समाजाचा विराट मोर्चा

हिंगोली, दि. 17 -  कोपर्डी बलात्काराच्या निषेधार्थ आज हिंगोलीत मराठा समाजाच्या मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. या मोर्चासाठी मराठा नागरिकांसोबतच, महिला जिल्हा परिषद मैदानावर दाखल झाले आहेत.
या मोर्चाला दुपारी 1 ची वेळ देण्यात आली होती, मात्र, सकाळी आठ वाजल्यापासूनच मराठा समाजातील बांधव मोठ्या संख्येने जिल्हा परिषदेच्या मैदानात दाखल होत होते. हा मोर्चा शिवाजीनगर मार्गे, गांधी चौक, बस स्टॅण्ड मार्गे निघणार आहे. या मोर्चाचा समारोप जिल्हाधिकारी कार्यालयासमोर होणार आहे. मराठा समाजाच्यावतीने विविध संघटनाच्या माध्यमातून नवी मुंबई, पुणे, सांगली, नांदेड, सोलापूर, सातारा आदी ठिकाणीही विराट मोर्चाचं आयोजन करणयात आलं आहे.