Breaking News

जपान ओपनमधून सिंधूची माघार

नवी दिल्ली, दि. 17 -  रिओ ऑलिम्पिकची रौप्यपदक विजेती बॅडमिंटनपटू पी.व्ही. सिंधूने पुढील आठवड्यात प्रारंभ होत असलेल्या जपान ओपन सुपर सिरिज स्पर्धेत सहभागी न होण्याचा निर्णय घेतला आहे.
रिओ ऑलिम्पिकमध्ये आपल्या कामगिरीने भारताला पदक पटकावून देणार्‍या स्टार बॅडमिंटनपटूने त्याचसोबत 27 सप्टेंबरपासून प्रारंभ होत असलेल्या कोरिया सुपर सिरीज स्पर्धेतूनही नाव वापस घेतले आहे. त्यानंतर पुढील महिन्यात 18 ऑक्टोबरपासून ओडेंसेमध्ये खेळल्या जाणार्‍या डेन्मार्क ओपन सुपर सिरिजमध्ये तिच्या पुनरागमनाची आशा आहे.