खड्ड्यांनी घेतला दुचाकीस्वाराचा बळी
जळगाव, दि. 29 - रस्त्यावरील खड्डे वाचवण्याच्या प्रयत्नात असताना भरधाव ट्रकने मोटारसायकलसह चालकाला मागील चाकात चिरडल्याची हृदयद्रावक घटना आज सकाळी म्हसावद रेल्वेगेटच्या अलीकडे घडली. औद्योगिक वसाहत पोलिस ठाण्यात याप्रकरणी ट्रक चालकाविरुद्ध गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.
जळगाव तालुक्यात परप्रांतीय राजस्थानी मजुरांचा गट रोजगारासाठी आला आहे. त्यातील वीस वर्षीय श्यामलाल लालचंद्र गढरी हा वावडदा येथे काही दिवसांपासून ठेकेदाराकडे वास्तव्याला होता. आज सकाळीनेहमी प्रमाणे सर्व कामगार म्हसावदकडे कामावर गेले होते. कामावर पोचल्यावर अवजार विसरला म्हणून श्यामलाल परत घराकडे एमएच 19 डीबी 7023 या दुचाकीने येत येत होता. म्हसावद रेल्वेगेटच्या अलीकडे असतानाच रस्त्यावरील खड्डा वाचवण्याच्या प्रयत्नात भरधाव वेगात आलेल्या ट्रकने क्र. जीजे 04 एक्स 5897 धडक दिल्याने श्यामलाल दुचाकीसह खाली पडला. याचवेळी ट्रकचे चाक दुचाकीसह श्यामलालच्या अंगावरुन गेल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. कामगारांचे ठेकेदार प्रकाशचंद अमरचंद पूर्बिया वय-29 यांच्या माहितीवरुन औद्योगिक वसाहत पोलिसात ट्रकचालकाविरुद्ध गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. तपास पोलिस उपनिरीक्षक नाना सूर्यवंशी करीत आहे.