4 कारखान्यासह 8 सहकारी संस्थांच्या लेखापरीक्षण अहवालात त्रुटी
सातारा, दि. 12 (प्रतिनिधी) : सातारा जिल्ह्यातील प्रमुख 4 सहकारी साखर कारखान्यांसह सुमारे 8 सहकारी संस्थांना 2014 व 15 सालच्या लेखापरीक्षण अहवालातील त्रुटींबाबत राज्यस्तरीय लेखा समितीने कारखान्यासह संस्थांच्या संंचालक मंडळाला सुनावणीसाठी हजर राहण्याचे आदेश बजावले आहेत. त्यामुळे सातारा जिल्ह्यातील सहकार क्षेत्रात खळबळ उडाली आहे.
सह्याद्री सहकारी साखर कारखाना कराड, कोयना सहकारी दूध प्रक्रिया संघ मर्या. कराड, वाई तालुका सहकारी सूतगिरणी, लि. बावधन, ता. वाई, हरणाई सहकारी सूतगिरणी लि. येळीव, ता. खटाव, लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखाना दौलतनगर, ता. पाटण, कोयना सहकारी बँक लि. मर्या. कराड, अजिंक्यतारा सहकारी साखर कारखाना लि. सातारा, अजिंक्यतारा सहकारी सूतगिरणी लि. वळसे या संस्थांच्या 2014 व 15 सालच्या लेखापरीक्षण अहवालातील दोष दुरुस्ती व अन्य त्रुटींबाबत लेखा परीक्षकांनी राज्यस्तरीय लेखा समितीकडे अभिप्राय सादर केले. संबंधित साखर कारखाने, दूध संस्था, बँका, सूतगिरणीच्या लेखा परीक्षणात दोष दुरुस्ती काढण्यात आली होती. लेखापरीक्षकांनी काढलेल्या दोष दुरुस्तींची व त्रुटींची पूर्तता अद्यापही झाली नाही. अशा दोष दुरुस्तीच्या मुद्द्यांची पूर्तता करण्यासाठी राज्यस्तरीय लेखा परीक्षण समितीने संबधित साखर कारखाने, दूध संस्था, बँका, सूतगिरणीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, कार्यकारी संचालक व संचालक मंडळाला अद्ययावत माहिती व संबंधित कागदपत्रासह दि. 16 व 17 सप्टेंबर रोजी सकाळी 10 वाजता शासकीय विश्रामगृह सातारा येथे हजर राहण्याचे आदेश बजावले आहेत.