Breaking News

चोरीस गेलेली 3 लाख 65 हजारांची गायछाप जर्दा जप्त

सातारा, दि. 12 (प्रतिनिधी) : येथील जुन्या औद्योगिक वसाहतीमधील मेहता एन्टरप्रायझेस गोडाऊनचा पत्रा उचकटून गायछाप जर्दाची 3 लाख 65 हजार रुपये किंमतीची 61 पोती मनोज शिंदे (वय 22, रा. संभाजीनगर, सातारा) व शुभम लिंगाळे (वय 21, रा. कडवे पाटण) यांनी चोरुन नेली असल्याची तक्रार पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी सापळा लावून तारळे भागात आरोपींना मुद्देमालासह अटक केली.
सातारा गुन्हे प्रकटीकरण विभागाने तारळे येथे सापळा रचून संबंधित आरोपींना ताब्यात घेतले. पोलिसांनी टाटा टेम्पो (एमएच 50/7931) व 61 गायछाप जर्दाची पोती असा एकूण 8 लाख 24 हजार रुपयांचा माल जप्त करण्यात आला. ही कारवाई पोलीस अधीक्षक संदीप पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक विजय पवार, उपविभागीय पोलीस अधिकारी, खंडेराव धरणे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक बी. आर. पाटील, सातारा शहर पोलीस ठाणे यांचे मार्गदर्शनाखाली सपोनि अविनाश पोवार व सातारा शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाने कारवाई केली. अधिक तपास पोलीस निरीक्षक बी. एन. पाटील हे करत आहेत.