Breaking News

कुपवाड एमआयडीसीत 3.60 लाखाची चोरी

कुपवाड, दि. 28 -  कुपवाड एमआयडीसीतून रविवारी मध्यरात्री तीन कारखान्यातून सुमारे 80 हजाराच़केबल लंपास झाली. तर रस्त्यावर उभ्या असलेल्या कारच्या काचा फोडून 3 लाख रुपयांची रोकड चोरट्यांनी पळवली.
अजित चिमड यांचा एजे इंजिनिअर्स, मनोज भोसले यांचा युनिटेक इंजिनिअर्स आणि उदय गुरव यांचा ओम इलेक्ट्रीकल असे जवळ जवळ कारखाने आहेत. रात्री मध्यरात्री 8 फुट भिंतीवरुन उडी मारऐतिहासिक  अज्ञात चोरट्यांनी तिन्ही कारखान्याच्या दरवाजाचे लॉक तोडून आत प्रवेश केला. अजित चिमड यांच्या कारखान्यातून 10 हजारा 30 मीटर वेल्डींग वायर, मनोज भोसले यांच्या कारखान्यातून 20 हजाराची 40 मीटर केबल आणि उदय गुरव यांच्या कारखान्यातून 50 हजार रुपये किंमतीची लायटिंग केबलचे तीन बॉक्स असा 80 हजाराचा मुद्देमाल लंपास केला. याबाबत रात्री उशिरापर्यंत कुपवाड पोलिसात गुन्हा दाखल झाला नव्हता.
कुपवाड एमआयडीसीत कारखान्याबाहेर लावलेल्या चारचाकीची मागील काच फोडून तीन लाख लंपास केल्याची घटना सायंकाळी उघडकीस आली. सुरेश रामचंद्र चिप्परगे (55, रा. टाकळी) यांनी वर्धमान कोल्ड स्टोअरेजमधून काढलेल्या रकमेवर चोरट्यांनी डल्ला मारला. याबाबत कुपवाड पोलिसात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल झालेला नव्हता.
सुरेश रामचंद्र चिप्परगे यांचा कुपवाड एमआयडीसीत वर्धमान कोल्ड स्टोअरेज (जे/7/58) हा कारखाना आहे. त्यांनी मनजित ठक्कर यांना पुष्पराज चौकाील एचडीएफसी बँकेतून तन लाखांचा स्वतःच्या नावाचा चेक देऊन रक्कम काढण्यास पाठविले होते. दुपारी साडेतीनच्या सुमारास रक्कम काढून ती साडेचारच्या सुमारास वर्धमान कोल्ड स्टोअरेजमध्ये चिप्परगे यांच्याकडे दिले. ती रक्कम गाडीतच ठेवून बाहेर पाऊस पडत असल्याने चिप्परगे आपल्या कारखान्यात बसून होते.