Breaking News

मांजरा धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू

लातूर, दि. 28 -  मांजरा धरणात मुबलक पाणी साठा झाला आहे. या धरणातून अधिकृतपणे 12 गावांना पाणी पुरवठा केला जातो. आज सकाळी या धरणातून पाणी सोडणे सुरु झाले आहे. या धरणाची सहा दारे 25 सेंटीमीटरने उघडण्यात आली आहेत. पाण्याचा विसर्ग सुरु आहे. आज मनपाचे पदाधिकारी आणि अधिकार्यांनी जलपूजन केले. यावेळी महापौर दीपक सूळ, आयुक्त रवींद्र पांढरे, सभापती विक्रांत गोजमगुंडे, विरोधी पक्षनेते मकरंद सावे, नगरसेवक गोरोबा गाडेकर, राजा मनियार, चंद्रकांत चिकटे, नवनाथ आल्टे, समद पटेल, राहूल माकणीकर, लक्ष्मण कांबळे उपस्थित होते.