चाकण परिसरात गावठी दारू अड्ड्यावर पोलिसांचा छापा सत्र
पुणे, दि. 01 - खेड तालुक्यातील चाकण जवळील संतोषनगर (भाम), वाकी खुर्द व शेलपिंपळगाव गावच्या हद्दीतील सुरू असलेल्या बेकायदेशीर गावठी दारूच्या गुत्यांवर व हात भट्ट्यांवर चाकण पोलिसांनी छापे मारले. यामध्ये हजारो रुपयांची दारू व त्यासाठीचे साहित्य नष्ट करण्यात आले.
वाकी गावालगत भामा नदी पात्रातील मोकळ्या जागेत काटेरी झुडपाच्या आडोशाला बेकायदेशीररित्या सुरू असलेल्या दोन गावठी भट्टीवर छापा टाकून दारू बनविण्याचे साहित्य, भट्टीतील गावठी दारू, कच्चा माल, रसायन, असा मुद्देमाल साहित्यासह जागेवर नष्ट करण्यात आला. पोलिसांचा छापा पडताच संबंधित आरोपींनी झाडाझुडपामधून धूम ठोकली असली तरी पोलिसांनी घटना स्थळावरून काही जणांना ताब्यात घेतले आहे.
पोलिसांनी अचानक सुरु केलेल्या छापासत्रात गावठी दारू पाडण्यासाठी लागणारी सर्व सामग्री पोलिसांनी यावेळी जप्त केली. खेड तालुक्याच्या हद्दीत गेल्या काही दिवसांपासून दारू बनवण्याचा व्यवसाया सुरु असल्याची माहिती चाकण पोलिसांना मिळाल्यानंतर वेगवेगळ्या ठिकाणी ही कारवाई करण्यात आली. या ठिकाणी तयार करण्यात येणार्या गावठी दारूचे परिसरात साखळी पद्धतीने वितरण करण्यात येत होते.
वितरणासाठी मोटारगाड्या किंवा दुचाक्यांचा वापर केला जात होता. दारू गाळणार्या काही व्यावसायिकांनी तालुक्याच्या हद्दीतील गावांत आपले जाळे पसरविले होते. आडबाजूला असल्यामुळे या हातभट्टीचे ठिकाण लक्षात येत नव्हते, पोलीस निरीक्षक संतोष गिरीगोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली चाकण पोलिसांच्या डी. बी. पथकाने माग काढून दोन भट्या उध्वस्त करीत काही जणांना ताब्यात घेतले आहे.
संतोषनगर भाम येथील छाप्यात 5 हजार 650 रुपयांचे रसायन, साहित्य पोलिसांनी जप्त केले आहे. तर भट्टी उध्वस्त केली. संबंधित भट्टीचा चालक विठ्ठल बाळू राजपूत ( सध्या रा. वाकी, ता.खेड) घटनास्थळावरून फरार झाला असून पोलिसांनी सायंकाळी उशिरा त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. वाकी खु. येथील भामा नदीच्या काठावर पोलिसांनी मारलेल्या छाप्यात 7 हजार 950 रुपयांचे साहित्य ताब्यात घेण्यात आले असून 105 लिटर गावठी दारू हस्तगत करण्यात आली आहे. या भट्टीचा चालक सनी सपकी राजपूत ( सध्या रा. वाकी, ता.खेड) हा फरारी झाला असून पोलिसांनी त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. शेलपिंपळगाव (ता. खेड) येथे गावठी दारूच्या गुत्त्यावर मारलेल्या छाप्यात प्रभू बिरबल राठोड यास ताब्यात घेण्यात आले असून त्याच्याकडून गावठी दारूची कॅन हस्तगत करण्यात आली आहेत.
पोलिसांनी जप्त केलेल्या मालामध्ये गावठी हातभट्टीची कॅन , कच्चे रसायन, गावठी दारू तयार करण्यासाठी लागणारी अन्य सामुग्री अशा हजारो रुपये रकमेच्या मालाचा समावेश आहे. चाकणचे पोलीस निरीक्षक संतोष गिरीगोसावी, सहा. निरीक्षक महेश ढवाण, उप निरीक्षक राकेश कदम, श्रीधर जगताप, महेश मुंडे, सहा. फौजदार सुदाम हरगुडे, अनिल जगताप, वैभव मदने, बाळासाहेब शितोळे, आदींच्या या पथकाने ही कारवाई केली.
पुढील तपास पोलीस करीत आहेत. दरम्यान चाकण पोलिसांनी सुरु केलेल्या या छापासत्राने अवैध धंद्यातील मंडळींचे धाबे दणाणले आहे.

Post Comment