Breaking News

मागासवर्गीय मुलींच्या वस्तीगृहाचा व वसाहतींचा प्रश्‍न सोडवा अन्यथा आंदोलन; फौजिया खान

पाथरी/प्रतिनिधी, दि. 24 - पाथरी शहरातील मागसवर्गीय मुलींचे वस्तीगृह कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय व गौतम नगर, श्रीनगर येथील नागरिकांच्या घराचे मालकी हक्क देण्याचा शासनाच्या उदासिनतेमुळे रंगाळत पडलेले प्रश्‍न तातडीने मार्गी लावण्यासाठी मी सदैव परिवर्तन मित्र मंडळाच्या पाठीशी खंबीरपणे उभी असून, शासनाने तात्काळ शाहरातील नागरिकांच्या जिव्हाळ्याचा प्रश्‍न न सोडविल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला राष्ट.ीय अध्यक्ष तथा माजी मंत्री डॉ.फौजिया खान यांची उपोषणार्थींना मार्गदर्शन करतांना केेले.
परिवतन मित्रमंडळाचे अध्यक्ष सईद खान उर्फ गब्बर सर्व्हे नंबर 67/1, 67/2 मधील शासनाच्या गायरान जमिनीवर महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्यायविभागाच्या वतीने मागासवर्गीय मुला आणि मुलींचे वसतीगृहाची बांधणी करावी, शहरातील कस्तुरबा गांधी निवासी बालीका विद्यालयाच्या इमारतीचे रखडलेले बांधकाम ताबडतोब पुर्ण करावे, शहरात क्रिडासकुल व उद्यानाची उभारणी करण्यात यावी, 1972 पासून माळीवाडा परिसरातील 67 सर्व्हे नंबर असलेल्या मागावर्गीय वसाहतींच्या नागरिकांना त्यांच्या जागेचे मालकी हक्क देण्यात यावे व साई रोडवरील डॉ.आंबेडकर सार्वजनिक हॉलची पुर्वबांधनी करण्यात यावी. या न्याय मागणीसाठी पाथरी तहसिल कार्यालयासमोर एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण करण्यात आले. या उपोषणार्थी नागरिकांना मार्गदर्शन करतांना डॉ.माजी मंत्री फौजिया खान पुढे म्हणाल्या की, 2002 पासुन मागसवर्गीय मुलींच्या वसतीगृहाचा प्रश्‍न तसेच कस्तुरबा गांधी विद्यालयाचा प्रश्‍न शासनाच्या नाकर्तेपणामुळे रेंगाळत पडला आहे. तसेच न्यायालयाचे आदेश असतांनाही शासनाचे कर्मचारी गौतमनगर, भीमनगर, येथील नागरिकांना त्यांचे मालकी हक्क देण्याचे धाडस का करत नाहीत त्या कर्मचार्‍यांना आता धडा शिकवल्याशिवाय आपण स्वस्त बसणार नाहीत त्या कर्मचार्‍यांना आता शासनाच्या गायरान जमिनीचे शासनाचे कर्मचारी बिनभोभाट खरेदी विक्रीचे व्यवहार करतात. मागासवर्गीय मुलींसाठी वसतीगृह उभारणीसाठी जागा उपलब्ध नसल्याचे कारणे सांगत आहेत. शासनाने जनतेच्या हिताचा व जिव्हाळ्याचे प्रश्‍न तातडीने न सोडवल्यास लोकशाही मार्गाने तीवृ आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी देण्यात आला.