Breaking News

आ.डॉ. राहुल पाटील पुरस्काराने सन्मानित

परभणी दि.24 (प्रतिनिधी) - भारतीय समता समाज परिषद दिल्लीच्या वतीने दिला जाणारा ’सर्वश्रेष्ठ शिक्षारत्न’ हा यंदाचा पुरस्कार आ. डॉ. राहुल पाटील यांना देण्यात आला आहे. नवी दिल्ली येथील मावळकर सभागृहात भारतीय समता समाज परिषदेच्या वतीने समता अवॉर्ड 2016 चे आयोजन 22 ऑगस्ट रोजी करण्यात आले होते. शैक्षणिक क्षेत्रातील योगदानाबद्दल राष्ट्रीयस्तरावरील हा पुरस्कार आ. डॉ. राहुल पाटील यांना देण्यात आला. पुरस्कार सोहळ्यास सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत असलेले देशभरातील मान्यवर उपस्थित होते.