डोक्यात हातोडा घालून पत्नीचा निघृर्ण खून
बीड, दि. 01 - दिंद्रुड पोलिस स्टेशन हद्दीतील कारी या गावात बायकोच्या डोक्यात हतोडा घालून खून केल्याची घटना घडली आहे. त्यानंतर आरोपी पतीने विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला आहे.
कारी येथील अश्विनी अर्जुन मोरे (26) या महिलेचा पती आरोपी अर्जुन नंदकिशोर मोरे याचे सायं 6 वाजेच्या दरम्यान बायकोसोबत भांडण झाले होते. याचा राग मनात धरत रात्री 11 वाजेच्या दरम्यान अश्विनीच्या डोक्यात हतोडा घालून निघृर्ण हत्या केली. या घटनेची माहिती दिंद्रुड पोलिसांना कळताच तात्काळ सहाय्यक पोलीस निरीक्षक रवी सानप, सहाय्यक पोलीस निरीक्षक पवार यांनी घटनास्थळाला भेट देली. घटनेचा पंचनामा केल्यानंतर मृत महिलेला शवविच्छेदनासाठी धारुर येथील शासकिय रुग्णालयात पाठवण्यात आले.
आरोपी अर्जुन मोरे याने घटनास्थळावर विष पिले, त्यास स्वामी रामानंद तिर्थ शासकीय रुग्णालय अंबाजोगाई येथे दाखल करण्यात आले असून त्याची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.