वृक्ष जगली तर माणुस जगेल - ज्ञानेश्वर महाराज
जालना, दि. 01 - सध्या प्रदुषणामुळे अनेक आजारांचा सामना नागरीकांना करावा लागत आहे, त्यामुळे वृक्ष लागवड ही काळाची गरज बनली आहे. वृक्ष जगली तरच माणुस जगेल असे प्रतिपादन ज्ञानेश्वर महाराज बारड यांनी केले आहे.जालना तालुक्यातील मौजुपरी गावातील तरुणांनी व्यसनापासुन दुर व्हावे यासाठी ज्ञानेश्वर महाराज बारड हे प्रयत्न करीत असुन सतत युवकांना मा
र्गदर्शन करुण त्यांच्या मनात चांगले विचार पेरण्याचे काम बारड महाराज यांनी केले आहे. त्यामुळे या वर्षापासुन गावात तरुणांनी व्यसन सोडुन पर्यावरण पुरक गाव निर्माण करण्याचा संकल्प केला असुन गावाच्या अवती भोवती वृक्ष लागवड करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या वृक्ष लागवड मोहीमेत गावातील सर्वच तरुणांनी सहभाग नोंदवला असुन त्याची सुरुवात दि. 29 जुलै रोजी करण्यात आली. गावापासुन रामेश्वर मंदीराकडे जाणार्या रस्त्यावर दुतर्फा झाडे लावण्यात आली. हळु हळु संपुर्ण गावाच्या भोवती झाडे लावण्यात येणार असुन गावाला प्रदुषण मुक्त करण्यात येणार आहे. हा संकल्प पुर्ण करण्यासाठी गावातील प्रत्येक युवकाच्या नावाने एक झाड आणि झाड जगवणार्याच्या नावाची पाटी त्या झाडाच्या भोवती लावण्यात येणार आहे. त्यामुळे गावात लवकरच हरियाली निर्माण होणार असल्याचा विश्वास ज्ञानेश्वर महाराज बारड यांनी व्यक्त केला आहे. यावेळी हनुमान महाराज बळप, गणेश महाराज डोंंगरे, पत्रकार अच्युत मोेरे, पुंजाराम नन्नवरे, भाागवत राऊत, निवृत्ती जाधव, गणेश काळे, बालाजी बळप, अंकुश काळे, कृष्णाा हिवाळे, बद्री राऊत, अनिरूध्द राऊत, डिगंबर डोंंगरे, सोनाभाऊ खडेकर, काळु बळप,बंडु कचरे, ज्ञानेश्वर सावंत, परमेश्वर डाेंंगरे, बळीराम गायकवाड, उध्दव बारड, विठल काळे, मधुकर काळे, पंडित काळे, विष्णु डोंंगरे, मेघनाथ गायकवाड, भागवत ढोक ळे, सुरेश गायकवाड, अर्जुन बळप,रामा मुळे, गणेश भुतेकर,ज्ञानदेव क ाळे यांच्यासह अनेक तरूणांची उपस्थिती होती.