। राष्ट्रीय अध्य रमेश साळवे यांच्या हस्ते उद्घाटन
पुणे, दि. 24 - स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून पुणे स्टेशनच्या ठिकाणी स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाच्या वतीने पुणे शहर युवक आघाडी शाखेचे उद्घाटन राष्ट्रीय अध्यक्ष रमेश साळवे यांच्या हस्ते करण्यात आले. राष्ट्रीय गीतानंतर मिठाईचे वाटप करण्यात आले. प्रसंगी प्रवक्ते महाराष्ट्रप्रदेश फिरोज मुल्ला, उपाध्यक्ष अरुण भिंगारदिवे, संघटक मनुभाऊ खरात, खजिनदार चंद्रकांत तुळवे, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष आप्पासाहेब गायकवाड, माथाडी कामगार अध्यक्ष राजेश नायर, पुणे जिल्हा अध्यक्ष अशोक जगताप, पिंपरी-चिंचवड अध्यक्ष संदिप चव्हाण, विलास घोरपडे, जोसेफ इद्रीस शेख, रिटाताई मरीयम, नियतीताई शिंदे, अतिश बनसोडे, सिद्धांत सूर्वे, राकेश सोनवणे, युवक अध्यक्ष गणेश भोसले उपस्थित होते.