ई-व्हिसा प्रणालीत सरकार आणखी सुधारणा करणार
नवी दिल्ली, दि. 29 - ई-व्हिसाची सुविधा 150 देशांना देण्यात आल्यावर सरकार यात आणखी सुधारणा करण्याच्या प्रक्रियेत गुंतले आहे,असे पर्यटन सचिव विनोद झुत्शी यांनी सांगितले.
150 देशांसाठी आम्ही ई-व्हिसाची सुविधा लागू केली आहे. त्यात आणखी सुधारणा करण्यात येत आहे. वैद्यकीय पर्यटन आणि व्यावसायिक पर्यटकांनाही अशी सुविधा देण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत आणि आता काही वेळेचाच हा प्रश्न उरला आहे, असे झुत्शी म्हणाले.
2014 मध्ये सुरू करण्यात आलेल्या या योजनेचा लाभ प्रथम 113देशांतील नागरिकांना देण्यात आला. त्यानंतर 37 देशांपर्यंत तिची व्याप्ती वाढवण्यात आली. आता या देशांची संख्या 150 झाली आहे. पर्यटन मंत्रालयाने तुर्की, इटाली, सौदी अरेबिया, मोरोक्कोसह 36 देशांना ही सुविधा लागू करण्याबाबत गृह मंत्रालयास सांगितले आहे.