Breaking News

उद्योगांना ठरावीक दराने वीज द्या

नवी दिल्ली, दि. 29 - उद्योगांना ठरावीक काळासाठी ठरावीक दराने वीज पुरवण्याचे आदेश सर्व राज्यांना केंद्र सरकारने दिले आहेत. गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. केंद्रीय उर्जामंत्री पीयूष गोयल यांनी लोकसभेत ही माहिती दिली.
देश आता पुरेशी वीजनिर्मिती करत असून त्यामुळे राज्यांनी विनाव्यत्यय वीजपुरवठा करून उद्योगांना आकर्षित केले पाहिजे, असे ते म्हणाले.
उद्योगांना विनाव्यत्यय वीजपुरवठा हवा आहे. जर आम्ही विजेची हमी देऊ शकलो तर उद्योगांमध्ये गुंतवणूक येणार आहे. त्यामुळे सर्व राज्यांनी उद्योगांना ठरावीक दराने दहा ते पंधरा वर्षासाठी वीज पुरवावी, अशी मी विनंती केली आहे.
केंद्रीय वीज प्राधिकरणाकडे राज्यांनी दिलेल्या माहितीनुसार, देशातील ऊर्जा तुटवडयाचे प्रमाण 2.1टक्के इतके कमी झाले आहे. दोन दशकातील हे सर्वात नीचांकी प्रमाण आहे. 2016-17 चालू आर्थिक वर्षात तर वीजतुटवडयाचे प्रमाण आणखी कमी होऊन फक्त 0.9 टक्क्यावर आले आहे, असे गोयल यांनी सांगितले.