पेप्सी-कोला टॉप फाईव्ह यादीतून बाहेर

2016च्या पहिल्या सहामाहीत आधुनिक रिटेल
साखळीतील ही पाहणी निल्सनने केली असल्याचे उद्योगातील अधिका-यानी सांगितले.
या पाहणीवरून जागतिक स्तरावर ग्राहकांचा जास्तीत जास्त कल आता कार्बन डायऑक्साईडचा समावेश असलेल्या पेयांपेक्षा आरोग्यदायी व कार्य करण्यास प्रेरक अशा पेयांकडे झुकत चालल्याचे दाखवले आहे.
मात्र ही आकडेवारी केवळ आधुनिक शहरांतील व्यापाराची असून या शीतपेयांचा पाया सर्वत्र व्यापक असल्याने साधारण व्यापारात त्यांची विक्री मोठया प्रमाणावर होत असू शकेल, असे स्पष्टीकरण अधिकार्यांनी दिले आहे.
काही ऑनलाईन विक्रेत्यांनीही ज्युसेस आणि आरोग्यदायी पेयांची विक्री गॅसने भरलेल्या पेयांपेक्षा जास्त होत असल्याचे सांगितले आहे. आरोग्यदायी पेयांची विक्री फारच झपाटयाने होत आहे.