Breaking News

पिंक पँथर बंगळूरू बुल्स सामाना टाय

जयपूर, दि. 01 -  प्रो कबड्डी लीग मध्ये अटीतटीच्या सामन्यात पुन्हा एकादा टाय सामना पाहायला मिळाला. शेवटच्या मिनिटाला निर्णय झालेल्या सामन्यात जयपूरने बुल्यच्या रोहित कुमारची पडक करून सामना बरोबरीत सोडविला. दुसरा लोण स्वीकारल्यानंतर आणि 11 गुणांनी पिछाडीवर पडल्यानंतर जयपूर पिंक पँथरने अखेरच्या 13 मिनिटांत तब्बल 15 गुणांची कमाई केली आणि संघावर आलेल्या पराभवाचे सावट दूर केले, त्यामुळे बंगळूर बुल्सविरुद्धचा सामना त्यांनी 28-28 अशा बरोबरीत सोडवला. प्रो कबड्डी स्पर्धेच्या चौथ्या हंगामातील हा दुसरा सामना बरोबरीत सुटला.
जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियमध्ये आपल्या घरच्या मैदानावर खेळणार्‍या जयपूरला विजयापेक्षा पराभव टाळल्याचेच समाधान अधिक होते. कर्णधार जसवीर सिंगने अखेरच्या दोन चढायांमध्ये कौशल्य दाखवत मिळवलेले दोन गुण मोलाचे ठरले, तर अखेरची दोन मिनिटे शिल्लक असताना असलेली 28-25 अशी आघाडी बंगळूरला कायम ठेवता आली नाही. विशेष म्हणजे त्यांना मध्यंतराची 23-12 ही आघाडीदेखील टिकवता आली नाही. त्यांना रोहित कुमारनंतर दुसर्‍या चढाईपटूची उणीव निश्‍चितपणे भासली.
जयपूरवर दोन लोण देऊन त्यांनी चांगली पकड मिळवली होती; पण अखेरच्या क्षणी जयपूरकडून जोरदार प्रतिकार सुरू झाल्यावर त्यांना संयम राखता आला नाही. सामन्यात 16 चढाया करणार्‍या जसवीरने नऊ गुणांची कमाई केली, तर राजेश नरवालने अष्टपैलू कामगिरी करताना सहा गुण मिळवले. तर बुल्स कडून रोहित कुमारने चढाईत चमक दाखविली.