Breaking News

नव्या महापौर सौ. कदम शनिवारी पदभार स्विकारणार

अहमदनगर, दि. 01 -   महानगर पालिकेच्या नव्या महापौर सुरेखा संभाजी कदम या शनिवार दि. 2 रोजी महापौर पदाचा कार्यभार स्विकारणार आहेत. शुक्रवार दि. 1 रोजी त्या शिवसेनेचे पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे यांची भेट घेऊन त्यांचा आर्शिवाद घेणार आहे. ठाकरेंच्या भेटीनंतरच्या महापालिकेत कार्यभार स्विकारणार असल्याचे शिवसेनेचे शहर प्रमुख संभाजी कदम यांनी सांगितले. अटी-तटीच्या झालेल्या निवडणुकीत सेनेतर्फे त्यांची महापौर पदी निवड बिनविरोध झाली होती.