पोलिसांचा प्रामाणिकपणा हरवलेली बॅग परत केली
अंबरनाथ, दि. 20 - 21 व्या शतकात प्रामाणिकपणा तसा पाहवयास मिळतच नाही. पण हा प्रामाणिकपणा दाखला तो शिवाजीनगर पोलिसांनी दुचाकीस्वार रस्त्याने जात असतांना त्याच्या डिक्कीतून नकळत त्याची पैशाची व महत्त्वाच्या कादपत्राची बॅग रस्त्यावर पडते व ती बॅग पोलिसांना सापडते. व अवघ्या काही तासात ती त्या इसमास पोलिसांनी परत केली. एखाद्या सिनेमात शोभेल असाच काहीसा प्रकार सोमवारी अंबरनाथमध्ये घडला, तो ऐरोली येथे राहणा-या विनय साही यांच्यासोबत. मुलुंडला कस्टम क्लिअरिंगचा व्यवसाय करणारे साही हे काही महत्त्वाची कागदपत्रे देण्यासाठी अंबरनाथ येथे राहणारा त्यांचा मित्र रमेश यांच्या घरी आले होते. मात्र घरी परतत असताना डोंबिवलीकडे जाणा-या पाईपलाईन रोडवर त्यांनी गाडीच्या डिक्कीत ठेवलेली बॅग त्यांच्या नकळत रस्त्यात पडली.
घरी पोहोचल्यानंतर बॅग पडल्याचे त्यांच्या लक्षात आले. या बॅगेत त्यांच्या व्यवसायाची महत्त्वाची कागदपत्रे आणि 1 लाख 3 हजारांची रोख रक्कम होती. सुदैवाने याचवेळी शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे पोलीस नाईक प्रशांत पाटील आणि सतीशकुमार वर्मा हे रंगोली हॉटेलसमोरून पेट्रोलिंग करत असताना त्यांना रस्त्यात एक संशयास्पद बॅग दिसली.