कर्नाटकातील अपघातात महाराष्ट्रातील आठ भाविक ठार
उस्मानाबाद, दि. 20 - कर्नाटक राज्यातील गाणगापूर येथे गुरुपौर्णिमेनिमीत्त दत्त दर्शनासाठी निघालेल्या उस्मानाबाद तालुक्यातील कनगरा येथील नऊ जणांवर काळाने झडप घातली आहे. आळंद तालुक्यातील लाडचिंचोली येथे भाविकांची क्रूजर आणि ट्रकची समोरासमोर धडक होवून नऊजण जागीच ठार झाले आहेत. तर आठ जण गंभीर जखमी असून त्यातील चौघांची प्रकृती अत्यावस्त आहे. मयतांमध्ये दोन लहान मुले, चार महिला आणि तीन पुरूषांचा समावेश आहे.
उस्मानाबाद तालुक्यातील कनगरा येथील इंगळे कुटूंबातील सदस्य गुरुपौर्णिमेनिमित्त मंगळवारी सकाळी गाणगापूरला रवाना झाले होते. दुपारी एक वाजण्याच्या सुमारास कर्नाटक राज्यातील आळंद तालुक्यातील लाडचिंचोली या गावानजीक भाविकांची गाडी (एमएच 25, आर 4583) आणि ट्रक यांच्यात समोरासमोर जोराची धडक बसली. यात नऊ जणांचा जीव गेला आहे. हा अपघात एवढा भीषण होता की भाविकांच्या गाडीचा चक्काचूर झाला आहे. मयतांना गाडीचा पत्रा कापून बाहेर काढावे लागले. मयतांमध्ये पाच वर्षीय चिमुकल्यांसह चार महिला आणि पाच पुरूषांचा समावेश आहे. या अपघातात संजय शिवाजी इंगळे (वय 33), वर्षा प्रभाकर ढोबळे (वय 30), सगजाबाई पंढरी आळंदे (वय 62), कांताबाई शिवाजी इंगळे (वय 63), कृष्णा संजय इंगळे (वय 5), गजाबाई श्रीमंत इंगळे (वय 60), स्वप्नील प्रभाकर ढोबळे (वय 4, सर्व रा. कनगरा), फुलचंद शिवाजी धरणे (रा. शिवाजीनगर) व अन्य एक जणाचा समावेश आहे.