Breaking News

केरळ सरकारकडून ‘ई’ सिगारेटवर बंदी

तिरुवनंतपुरम्, दि. 02 - केरळ सरकारने ‘इलेक्ट्रॉनिक सिगरेट’वर बंदी आणण्याचा निर्णय घेतला आहे. ‘ई’ सिगारेटमुळे विविध आजार होतात, हे विविध अध्ययन आणि संशोधनानंतर सिद्ध झाल्याने हा निर्णय सरकारने घेतला आहे. ई-सिगरेटमुळे कर्करोग आणि हृदयरोग होतो, असा निष्कर्ष या संदर्भात अभ्यास करणार्‍या आरोग्यविषयक संस्थांनी काढला आहे. अतिरिक्त मुख्य सचिवांना (आरोग्य) आदेश देऊन इलेक्ट्रॉनिक सिगारेटचे उत्पादन, विक्री आणि जाहिरातीवर तत्काळ बंदी आणण्यास केरळच्या आरोग्यमंत्री के. के. शैलजा यांनी सांगितले.