Breaking News

महामार्ग खराब झाल्याने त्रिपुरात इंधन टंचाई

आगरताळा, दि. 02 - आसाम-त्रिपुरा हा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 44 खराब झाल्याने आसाममधून त्रिपुरा येथे टँकरद्वारे होणारा इंधनपुरवठा थांबला आहे. त्यामुळे नागरिकांना तीव्र इंधन टंचाईला सामोरे जावे लागत आहे. आसाममधून त्रिपुरा येथे टँकरने इंधनपुरवठा करण्यात येतो. त्रिपुरा येथील बहुतेक पेट्रोल पंपांवरील इंधन संपले आहे. तर ज्या पंपांवर इंधन शिल्लक आहे, अशा पंपांवर वाहनांची लांब रांग लागली आहे. गेल्या महिनाभरापासून ही टंचाई जाणवत आहे.