कंपाऊंड वॉल कोसळून 9 गाड्यांचा चक्काचूर
ठाणे, दि. 02 - ठाण्यातील घोडबंदर रोडवरील आर मॉल व रुनवाल इस्टेटदरम्यान असलेली कंपाऊंड वॉल कोसळून रुनवाल इस्टेटमधील 9 गाड्यांचा चक्काचूर झाला आहे. गेल्या काही दिवसांपासून होणार्या मुसळधार पावसामुळे ही भिंत कोसळल्याची शक्यता व्यक्त होत आहे. सुदैवाने या दुर्घटनेत कोणीही जखमी झालेले नसले तरी 9 गाड्यांचे मोठे नुकसान झाले आहे. आप्तकालीन विभाग मदत व्यवस्थापन व फायर ब्रिगेडचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले असून मिनी क्रेनच्या सहाय्याने कारवरील ढिगारा हटवण्यात येत आहे.
