Breaking News

सुर्यवंशीच्या पापाला उद्या फुटणार वाचा

सार्वजनिक बांधकाम : संजय सावंत यांचे मंगळवारपासून धरणे आंदोलन

औरंगाबाद, विशेष/प्रतिनिधी, दि. 04 - अधिक्षक अभियंता ए.बी. सुर्यवंशी यांच्या एकुण कार्यशैलीची विभागीय चौकशी व्हावी तसेच त्यांच्या मालमत्तेचीही  एसीबीनेही सखोल चौकसी करावी या मागणीसाठी शिवक्रांती युवा सेनेने पुकारलेल्या आंदोलनाला अखेर शासनाने परवानगी दिली असून मंगळवारपासून  आंदोलनाची धग वाढणार आहे. दरम्यान या वृत्तामुळे मागासवर्गीय अधिकार्‍यांमध्येही समाधान व्यक्त केले जात आहे. 
औरंगाबाद साबां मंडळाचे अधिक्षक अभियंता ए.बी.सुर्यवंशी यांची मन मानी, भ्रष्ट कार्यशैली आणि मागासवर्गीय अभियंत्यांविषयी असलेला आकस साबांत नाराजी  निर्माण करण्यास कारणीभूत ठरला आहे. ए.बी.सुर्यवंशी यांनी साबांमंडळाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर लाचखोर प्रवृत्तीने जोर धरला लाच देणार्‍या कंत्राटदारांचे  प्रस्थ वाढले. लाच देतील त्याच कंत्राटदारांना कामे देण्यापासून देयके अदा करण्याचा पायंडा सुर्यवंशी यांनी सुरू केला. अर्थात सुर्यवंशी यांच्यापूर्वी साबांमंडळात  सारे काही आलबेल होतं असे नाही पण सुर्यवंशी यांच्या कार्यकाळात प्रामाणिक कंत्राटदारांना साबां मंडळात प्रवेश जवळजवळ नाकारण्यात येऊन भ्रष्ट  कंत्राटदारांचेच वर्चस्व निर्माण झाले अर्थात काम मिळणे आणि कामांवर झालेला खर्च वसुल झाला तर कंत्राटदार जगेल, म्हणून नाईलाजास्तव का होईना  सुर्यवंशीच्या लाचखोरीला बळी पडण्यास कंत्राटदार राजी होतात.
लाचखोरी ही सुर्यवंशी यांची प्रवृत्ती आहे. औरंगाबादमध्येच नव्हे तर संगमनेर, पुणे, अहमदनगर या ठिकाणीही सुर्यवंशी विषयी हिच बोंब आहे. असा लाचखोरीतून  सुर्यवंशी यांनी प्रचंड काळी संपत्ती जमा केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. त्यांची चौकशी व्हावी अशी चर्चा दबक्या आवाजात सुरू असतांनाच या चर्चेला  शिवक्रांती युवा सेनेने बळ दिले आणि एसीबीने त्यांच्या मालमत्तेची चौकशी करावी, तसेच साबांप्रशासनाने त्यांनी मंजूर केलेल्या व देयके अदा केलेल्या कामांची  विभागीय चौकशी करावी अशी मागणी शिवक्रांती युवा सेनेने केली आहे. ही मागणी पुर्णत्वास जावी म्हणून धरणे आंदोलन करण्यासाठीही त्यांनी परवानगी  मागितली होती. अखेर विभागीय महसुल आयुक्त उमाकांत दांगट यांनी मंगळवार दि. 5 जुलैपासून आंदोलन करण्यास संजय सावंत यांना परवानगी दिली आहे.