ब्राम्हणी कावा ओळखा
ब्राम्हणांचे धर्मग्रंथ, ब्राम्हणांचे इतिहास, ब्राम्हणांचे चित्रपट, ब्राम्हणांचे कथाकार, ब्राम्हणांचे किर्तनकार असे सर्वच लहान-मोठे ब्राम्हण सांगत असतात की, जगातील प्रत्येक ब्राम्हणोत्तर मोठी व्यक्ती ही ब्राम्हण आशीर्वादानेच मोठी झाली. ब्राम्हण शिक्षक, ब्राम्हण गुरू, ब्राम्हण पुजारी, ब्राम्हण मित्र अशा अनेक क्षेत्रांतील ब्राम्हणांच्या कृपाप्रसादानेच श्रीराम, श्रीकृष्ण, चंद्रगुप्त, मौर्य, छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, डॉ. श्रीकांत जिचकर, यशवंतराव चव्हाण, शरदराव पवार असे महामानव बहुजनांत झाल्याचा ब्राम्हणांचा दावा आहे. म्हणजे शुद्रातिशुद्र बहुजनांच्या कल्याणासाठी ब्राम्हण झटत आहेत. या निमित्ताने आमची ब्राम्हणांना नम्र विनंती आहे की, तुम्ही भारतातच राहत आहात. आम्ही भारतातच आहोत. आपण सर्व एकाच राष्ट्राचे नागरिक आहोत. एकाच राष्ट्रात राहू. आपले ब्रीद आहेच. अनेक रंग असूनही विविधतेत एकता. आपण भारतीय म्हणून एकाच राष्ट्रधर्माचे पालन करू. तो भारत निधर्मी भारतराष्ट्र असेल. शिवराष्ट्र असेल. वैदिक भारत वा हिंदू भारत नसेल. हा एक राष्ट्रधर्म तुम्हाला चालायला हरकत काय आहे? दुसरे तुम्ही एवढे पॉवरफूल आहात की, तुमच्या अंगातून रस्त्याने चालता-चालता वीर्य बाहेर येते. त्यात माती मिसळल्यास महाशक्तिशाली सुपरमॅन तयार होतो. तुमच्या ज्ञानदानाने वर सांगितलेले मोठमोठे महामानव तयार झाले. द्रोणाचार्याच्या मातीच्या मूर्तीने एकलव्यास जागतिक धनुर्धारी बनविले. आमची तुम्हाला पुन्हा एकदा आग्रहाची विनंती आहे की, आता तुम्ही आम्हाला आमच्या झोपडीत उकिरड्यावर जन्मू द्या व जगू द्या. तुम्ही तुमचे स्वर्गात सुख उपभोगा. तुम्ही आमचा श्रीराम, हनुमान, श्रीकृष्ण, चंद्रगुप्त, श्री शिवाजी, महात्मा ज्योतिबा फुले... यांना मोठे करण्यापेक्षा सर्वच ताकद तुमच्याच ब्राम्हणावर लावा. त्यातून तुमचेच परशुराम, वाम, द्रोणाचार्य, नारद, रामदास, टिळक, चिपळूणकर, खापर्डे, गोळवकर, सावरकर, पुरंदरे, एकबोटे, बेडेकर असे ब्राम्हण सिंह तयार करा. गेल्या हजार वर्षांत ब्राम्हणांनी एकतरी श्रीराम मंदिर, श्रीकृष्ण मंदिर, श्री शिवाजी मंदिर उभारले आहे काय? ब्राम्हण-मराठा बहुजनांपासून दूर गेला आहे. अशीही ओरड काही दीड शहाणे करतात. ब्राम्हण-मराठा बहुजन समाजाचा घटक, हितकर्ता सहकारी कधी होणार? तसेच ब्राम्हण बहुजनांपासून दुर केल्यानंतर ऐकदा तरी अधिवेशनात तशी खंत व्यक्त केली काय? त्याने चुकीची कबुली दिली आहे काय? बहुजन समाजाची माफी मागितली काय? एवढेच कशाला त्याने दूर जाऊन आपल्या स्वतंत्र विकासाचे, अस्मितेचे व ब्राम्हण्याचे अत्युच्च प्रतीक वा अत्युच्च प्रेरणास्थान म्हणून परशुरामास स्वीकारले आहे. भारतभर कर्नाटक, पंजाब, कोकण परिसरात परशुरामाचे 50-50 फूट उंचीचे पुतळे ब्राम्हण उभारत आहेत. परशुरामास प्रेरणास्थान मानणारे व त्याचा पुतळे उभारून उदो-उदो करणारे ब्राम्हण गरीब आहेत काय? दुबळे आहेत काय? मानवतावादी आहेत काय? अहिंसावादी आहेत काय? आणि अशा ब्राम्हणावर माया-दया वा इतर मानवतावादी प्रेमाचा वर्षाव करणे, हा निसर्गाचाच मोठा अपमान होईल.
