हमाल पंचायतचा सोमवारी मोर्चा : घुले
अहमदनगर (प्रतिनिधी)। 03 - राज्यशासन सर्वच क्षेत्रात कष्टकरी आणि शेतकरी यांच्या हिताचा विचार न करता निर्णय घेत आहे. कृषि उत्पन्न बाजार समितीच्या नियमनातून फळे, भाजीपाला, कांदा, बटाटा आदी वगळण्यात आल्याच्या निषेधार्थ जिल्हा हमाल पंचायतीच्यावतीने सोमवार दि. 4 रोजी मोर्चा व निदर्शने करण्यात येणार असल्याची माहिती हमाल पंचायतचे अध्यक्ष अविनाश घुले यांनी दिली.
शेतकर्यांना वाट्टेल तेथे शेतमाल विक्रीस मोकळीक देण्यात येऊन आडत , हमाली, तोलाई, मार्केट सेस इत्यादी करातून सूट देण्यात येईल, असा निर्णय घेण्यात आला आहे. आडत आणि सेस बाबतचा उपाय असा असूच शकत नाही त्याबाबत शेकड्याऐवजी नगावर तो घेता येईल का ?त्याबाबत विचारपूर्वक अभ्यास करुन निर्णय घेणे आवश्यक होते. हमाली, तोलाई ही नगावर असते. ती हाताच्या बोटावर मोजता येईल इतकी तुटपुंजी असते. याबाबी लक्षात घेता शासनाला खरोखर शेतकरी हिताचा निर्णय घ्यायचाच असेल तर उत्पादन खर्चावर आधारीत शेतमालाला हमी भाव दिला पाहिजे. त्यासाठी स्वामीनाथन समितीच्या अहवालावर अंमलबाजवणी करण्याचे सोडून जुजबी निर्णय घेऊन हमाल-मापाडीच्या जीवनात माती कालवणारा निर्णय शासनाने घेतला आहे. या निर्णयाच्या निषेधार्थ मोर्चा व निदर्शनाचे आयोजन करण्यात आल्याचे श्री. घुले यांनी म्हटले आहे.