Breaking News

आश्‍वासने तोडणार्‍यांचे मोदी ‘पोस्टर बॉय’

काँग्रेसची पंतप्रधान मोदींवर टीका 

नवी दिल्ली, दि. 03 - सत्तेत येण्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतासह जगाला अनेक आश्‍वासने दिली. पण, आता दोन वर्षातच त्यांचे सत्य जगासमोर येत असून, मोदी हे आ काँग्रेसने मोदींना लक्ष्य करताना सांगितले की, मोदींचे सरकार आणि त्यांचे राजकारण हे असत्यावर आधारलेले आहे. ते आश्‍वासने तोडणार्‍यांचे पोस्टर बॉय आहेत. मोदींनी दिलेली आश्‍वासने उघडी पडत आहेत. मोदींनी दोन कोटी नागरिकांना नोकरी देणार असे म्हटले होते. पण, प्रत्यक्षात 1.35 लाख नागरिकांनाच नोकरी मिळाली आहे. यूपीए सरकारच्या काळात 2011 मध्ये 9 लाख रोजगार उपलब्ध करून देण्यात आले होते.
श्‍वासने तोडणार्‍यांचे ‘पोस्टर बॉय‘ असल्याची जोरदार टीका काँग्रेसने केली आहे. तसेच त्यांचे सरकार हे खोटारड्यांचे सरकार असल्याचेही काँग्रेसने म्हटले आहे.
काँग्रेसने आपल्या संकेतस्थळावर विविध मुद्द्यांवरून मोदींवर टीका केली असून, मोदींच्या नेतृत्वाखाली अर्थव्यवस्थेची प्रगती होईल असे सांगण्यात आले होते. मात्र, प्रत्यक्षात तसे काहीच दिसत नाही. पठाणकोट, पांपोर, हजारवेळा शस्त्रसंधीचे उल्लंघन यातून मोदींच्या परराष्ट्र नितीचे पितळ उघडे पडत आहे. आता एनएसजी सदस्यत्वावरून चीननेही भारताला तोंडघशी पाडत पाकिस्तानला पाठिंबा दिला आहे. तरीही तज्ज्ञ मोदींजींच्या परराष्ट्र धोरणाचे गुणगान गात आहेत, अशी खरमरीत टीका करण्यात आली आहे.