बगदादमध्ये बॉम्बस्फोटात 83 ठार
‘आयसिस’ने स्वीकारली हल्ल्याची जबाबदारी
बगदाद, दि. 03 - इराकची राजधानी असलेल्या बगदादमध्ये शनिवारी मध्यरात्री दोन शक्तीशाली बॉम्बस्फोट घडवण्यात आले असून, या भीषण बॉम्बस्फोट 83 ठार तर 200 जण जखमी झाल्याची माहिती आहे. या हल्ल्याची जबाबदारी ‘आयसिस’ने स्वीकारली असून हा आत्मघातकी हल्ला असल्याचा दावाही आयसिसने केला आहे. इराकी सैन्य पथकांनी फालुजा शहर इसिसकडून आपल्या ताब्यात घेतल्यानंतर हा हल्ला झाला आहे.पहिला बॉम्बस्फोट कर्राडा भागात करण्यात आला. ट्रक रेफ्रिजरेटरमध्ये हा बॉम्ब ठेवण्यात आला होता. कर्राडा हे सर्वाधिक वर्दळीचे ठिकाण आहे. त्यातच रमझान असल्यामुळे बाजारपेठेत नागरिकांची अधिकच गर्दी होती. अचानक झालेल्या स्फोटाने सगळीकडे आक्रोश पसरला. अनेक ठिकाणी आग लागली. तर दुसरा बॉम्बस्फोट अल-शाब शहरात घडवण्यात आला. या दोन्ही स्फोटात मिळून 82 जण ठार तर 200 पेक्षा जास्त जण जखमी झाले आहेत. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
