उत्पादन क्षेत्रात तीन महिन्यातील उच्चांक
नवी दिल्ली, दि. 03 - उत्पादन क्षेत्राने जूनमध्ये प्रथमच वाढ नोंदवली असून ती तीन महिन्यातील उच्चांकी आहे. नव्या व्यवसायाच्या मागणीत जोरदार वाढ हे त्यामागे असून महागाईचा दबाव कमी झाल्याने रिझर्व्ह बँक कर्जाच्या दरात कपात करण्याची शक्यता आहे, असे मत एका पाहणीत व्यक्त करण्यात आले आहे.
निक्की मार्केट इंडिया मॅन्युफॅक्चरिंग पर्चेसिंग मॅनेजर इंडेक्सअनुसार मेमध्ये 50.7 वर असलेली उत्पादन क्षेत्राची कामगिरी जूनमध्ये 51.7 वर गेली आहे. नव्या व्यवसायाच्या मागणीत जोरदार वाढ झाली आहे. 50च्या वर नोंद असेल तर ती विस्तार समजली जाते तर 50च्या खाली असेल तर घट समजली जाते.
2016च्या मध्याला भारतीय कारखान्यांनी उत्पादन आणि नव्या व्यवसायांच्या बाबतीतही वाढ नोंदवली आहे, परंतु उत्पादक मात्र अजूनही हात आखडता घेत आहेत, असे मार्किटचे अर्थतज्ज्ञ पॉलिअण्णा डे लिमा यांनी सांगितले. भारतातील आर्थिक वाढ ही नव्या व्यवसायांचा स्थिर प्रवाह पुरवत असल्याने देशांतर्गत बाजारपेठ हीच वाढीचे इंजिन ठरले आहे, असे लिमा यांनी सांगितले.
मेमध्ये कमी झालेल्या परदेशी मागणी जूनमध्ये वाढली. तरीही जागतिक बाजारात मागणीचे चित्र निष्प्रभ असल्याने भारतीय उत्पादकांना चिंतेचे सावट आहेच, असेही त्यांनी स्पष्ट केले. पूर्वीच्या निकषांप्रमाणे पाहिल्यास विस्ताराचा दर कमकुवत राहिला आहे, कारण एप्रिल ते जून दरम्यान पीएमआयची सरासरी त्याआधीच्या कालावधीत कमी राहिली आहे.