मुसळधार पावसामुळे मुंबईत वाहतून विस्कळीत
नवी मुंबई, दि. 03 - मुंबई शहर आणि उपनगरात शुक्रवारपासून सुरू असलेल्या पावसाचा जोर शनिवारीही कायम राहिल्याने मुंबईतील वाहतूक मंदावली आहे. रस्ते आणि रेल्वे वाहतुक धिम्या गतीने सुरू आहे तर अनेक सखल भागात पाणी साचल्याने वाहतूक कोंडी झाली.
रेल्वे वाहतूक सेवेवर पावसाचा परिणाम झाला असून तिन्ही मार्गावरील वाहतूक उशिराने सुरू आहे. हार्बरच्या अप आणि डाऊन मार्गावरील गाड्यांचा वेग मंदावला आहे. तर पश्चिम आणि मध्य रेल्वेची वाहतूक साधारणपणे 15 ते 20 मिनिटे उशिराने सुरु आहे.
दादर, परळसह दक्षिण मुंबईत जोरदार पाऊस सुरु आहे. दादार येथील हिंदमाता परिसरात तसेच अनेक सखल भागात पाणी साचले आहे. पूर्व द्रुतगती मार्गावर अमर महाल जंक्शनजवळ ट्रक उलटल्याने कुर्ल्याहून मुंबईकडे जाणारी वाहतूक धीम्या गतीने सुरु आहे. तर पश्चिम उपनगरांत मुसळधार पावसामुळे पश्चिम द्रुतगती मार्गावर अनेक ठिकाणी वाहतुकीचा वेद मंदवला आहे.
पुण्यातही पावसाची संततधार सुरु आहे. कोकण परिसरातही पावसाचा जोर कायम असून रत्नागिरी जिल्ह्यात गेले सुमारे आठ दिवस पडत असलेल्या संततधार पाऊस सुरू आहे. दरम्यान, येत्या काही तासात मुंबईत जोरदार पाऊस सुरुच राहील असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.