Breaking News

रॉबर्ट वड्रांना अडकवण्यासाठी भाजपकडून धींग्रा आयोगाला लाच ! काँग्रेसचा आरोप

नवी दिल्ली, दि. 01 -  गुरगाव जमिन व्यवहार प्रकरणात काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांचे जावई रॉबर्ट वड्रा यांना अडकण्यासाठी हरयाणामधील भाजप सरकारने माजी न्यायमूर्ती एस.एन.धींग्रा यांना लाच दिली असा आरोप हरयाणाचे माजी मंत्री आणि सहावेळा काँग्रेसचे आमदार राहिलेले कॅप्टन अजय यादव यांनी केला आहे. 
खासगी कंपन्यांना व्यावसायिक परवाने कसे दिले ? याची चौकशी करण्यासाठी मागच्यावर्षी 14 मे रोजी भाजपने धींग्रा आयोगाची स्थापना केली. या चौकशीत वड्रा यांच्या स्कायलाईट हॉस्पिटॅलिटी कंपनीचाही समावेश आहे. धींग्रा अध्यक्ष असलेल्या ट्रस्टने शाळा बांधली आहे. या शाळेकडे जाणारा रस्ता बांधायला भाजप सरकारने मंजुरी दिली यावरुन यादव यांनी आरोप केला आहे.
तर दुसरीकडे काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सूरजेवाला यांनी ही जोरदार टीका केली आहे. सुरजेवाला म्हणाले की,  ‘न्यायाधीश धिंग्रा अध्यक्ष असलेल्या एका ट्रस्टवर हरियाना सरकारने कृपा केली आहे. त्यामुळे धिंग्रा यांनी पदाचा गैरवापर केला आहे. भारतीय जनता पक्षातील उच्चपदस्थांकडून धिंग्रा यांचा वापर करण्यात येत आहे. ते म्हणाले की चौकशीचा अहवाल तयार आहे. मात्र शेवटच्या मिनिटाला त्यांनी काही नवीन पुरावे मिळाले असून चार ते सहा आठवड्यात अहवाल सादर करणार असल्याचे सांगितले.‘ तसेच ‘याचा अर्थ स्पष्ट आहे की सरकारमधील लोक धिंग्रा आयोगाचा वापर करत असल्याचा आरोप सूरजेवाला यांनी केला आहे.