उत्तराखंडमध्ये ढगफुटी होऊन 30 ठार
डेहराडून, दि. 1 - उत्तराखंडमधील बस्ताडी गावासह अनेक ठिकाणी ढगफुटी होऊन 30 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून अनेक घरे वाहून गेल्याने नागरिक बेघर झाले आहेत. उत्तराखंड राज्यातील पिथोरगड गावापासून सुमारे 50 किमी अंतरावर असलेल्या बस्ताडी गावाला ढगफुटीचा मोठा फटका बसला असून आत्तापर्यंत 5 जणांचे मृतदेह हाती लागल्याची माहिती गावकर्यांनी दिली. तसेच मंदाकिनी नदीच्या काठावर असलेल्या गोपेश्वर व चमोली येथेही ढगफुटी झाली अनेक घरे वाहून गेली आहेत व 9 जणांचा मृत्यू झाला.