आ.राहूल बोंद्रे यांच्या हस्ते वृक्षारोपन
चिखली (प्रतिनिधी) दि. 03 - संपुर्ण राज्यात दरवर्षी शासकीय यंत्रणा व सामाजिक संघटना यांच्या मार्फत कोटयावधी वृक्षाची लागवड केल्या जाते, परंतु पाहिजे त्या प्रमाणात वृक्षाचे संगोपन होत नाही. त्यामुळे वन विभागाच्या सामाजिक वनीकरण योजने मार्फत आज जो वृक्षरोपनाचा कार्यक्रम घेण्यात येत आहे. हे वृक्ष कोणत्याही परिस्थीतीत जगलेच पाहिजे, त्यांच्या संगोपन करणे ही वनविभागचे नैतीक कर्तव्य असल्याचे मत आमदार राहुलभाउ बोंद्रे यांनी आज वन विभागाच्या वतीने आयोजित चिखली मतदार संघातील असोला नाईक येथील वृक्ष लागवड प्रसंगी बोलतांना व्यक्त केले. आज वन विभागाच्या 25 हेक्टर रोपवनात 21500 झाडे वन विभाग लावत आहे ही बाब अभिनंदनीय आहे. या वृक्षांची जोपसणा करणे गरजेचे असून नागरीकांनी देखील यात सहभागी होणे गरजेचे आहे असे आवाहन केले.
या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थितीत बाजार समितीचे सभापती विष्णु पाटील, जि.प.माजी सदस्य समाधान सुपेकर, बाजार समितीचे संचालक ज्ञानेश्वर सुरूशे, प.स.माजी सदस्य भारत खासभागे, युवक कॉगे्रसचे राम डहाके, पो.पा. गणेश गायकवाड, दारासिंग पवार, सुभाष कटारे, अनिल राठोड, मनोज लाहुडकर, सरपंच सुनिल राठोड, आडे, वनविभागचे भगत साहेब, झोले साहेब, तसेच कर्मचारी होते.