Breaking News

दे.महि येथे विविध ठिकाणी वृक्षारोपन

बुलडाणा, दि. 03 - अनेक वेळ वृक्षारोपन हे केवळ कागादावर, फोटोपुरते, किंवा स्वतःच्या प्रसिध्दीसाठी केले जाते. मात्र दे.महि येथ वन महोत्सव दिनानिमित्त शासकीय, निमशासकीय शाळा, कॉलेज, असंख्य नागरीकांनी स्वतः वृक्ष लागवड केले. सामाजिक संस्था यांनी वृक्ष लागवड करुन वृक्षसंवर्धनाचा संदेश देवून प्रत्येक लावलेल्या झाडावचे पालकत्व सर्व कार्यालयांनी स्वीकारले. यावेळी ग्रामपंचायत कार्यालय, अंगनवाडी, स्टेट बँक ऑफ इंडिया, नेहरु युवा केंद्र, ग्रामीण रुग्णालय, सहकार विद्या मंदिर, मराठी कन्या व मुलांची प्राथमिक शाळा, पारधी वाडा, पशु वैद्यकीय दवाखाना, शिवाजी विद्यालय, विविध सामाजीक, शासकीय, निमशासकीय कार्यालयाच्या वतीने वृक्षरोपन करण्यात आले. यावेळी ग्रामीण रुग्णालयाचे विविध वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी, व नागरीकांची उपस्थिती होती.