विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे धरणे
बुलडाणा, दि. 03 - राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था अंतर्गत माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा, आश्रमशाळा व अपंग विद्यार्थ्यांच्या शाळांमधील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचा-यांच्या अनेक वर्षापासून प्रलंबित असलेल्या मागण्यांचा पाठपूरावा करण्यासाठी विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाच्यावतीने आज दि. शनिवार 2 जुलै रोजी जिल्हा परिषद शिक्षणाधिकारी माध्यमिक यांच्या कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी शिक्षणमंत्री यांना निवेदनही पाठविण्यात आले.
शालेय शिक्षणमंत्री महाराष्ट्र राज्य यांना दिलेल्या निवेदनात नमूद आहे की, शिक्षकांना संच मान्यतेचे जुनेच निकष कायम ठेवावे, शिक्षक कर्मचा-यांना जुनी पेंशन योजना लागू करावी, कायम विना अनुदान तत्वावर मान्यता दिलेल्या खाजगी माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा व तुकड्या अनुदानासाठी पात्र ठरविणेबाबत निकष शिथील करण्यात यावे, सातव्या वेतन आयोगाच्या संभाव्य वेतन विषय शिफारशी राज्यातील शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचा-यांना लागू करण्यासंबंधी येत्या पावसाळी अधिवेशनामध्ये निधीची तरतूद करण्यात यावी, आर.टी.ई. कायद्यानुसार इयत्ता 6 वी ते 8 च्या वर्गाला अध्यापक भरणा-या सर्वच पात्र शिक्षकांना बी.एड. शिक्षकांची वेतनश्रेणी मंजुर करण्यात यावी, शिक्षकांना ऑनलाईन पध्दतीने वेतन व नॉन प्लॅनमध्ये रुपांतरीत होण्यास पात्र ठरणा-या प्लॅन मधील शाळा व तुकड्यावरील शिक्षकांचे वेतन नॉन प्लॅन पध्दतीने अदा करण्यात यावे, न.प., महानगर पालिकेच्या शिक्षकांना वैद्यकिय खर्चाची प्रतिपुर्ती योजना लागू करण्यात यावी, शिक्षकांना दर महिन्याच्या 1 तारखेला वेतन अदा करण्यात यावे, यासह आदी प्रलंबित मागण्यांसाठी धरणे आंदोलन करण्यात आले.
या धरणे आंदोलनात जिल्हाध्यक्ष बाबाराव कडू, जिल्हा कार्यवाही शरद सातव, राम बारोटे, रमेश वाशिमकर, संजय देशमुख, रविंद्र बोंडगे, एन.बी. डोंगरे, एस.एन.डाबरे, जे.एस.फोपळे, फिरोज खान, संजय देशमुख, पी.पी.भागवत, विजय भोयर, रहेबर खान, आर.के.दांदडे, अखिल तांबोळी, तेजणकर, आर.एस.सावदेकर, एम.सी.सेंगर, अरुण महाले, जी.वाय.सपकाळ, डी.पी.शेळके, सुभाष पाटील, एस.एस.चव्हाण, वकार अहमद खान, बि.एस.नागरे, एस.बी. पाचरणे यासह आदी उपस्थित होते.