Breaking News

विद्यार्थीनीचे लैंगिक शोषण प्रकरणी.. पोलिस दक्षता समितीकडून निषेध

बुलडाणा (प्रतिनिधी), दि. 07 - यवतमाळ येथील वाय.पी.एस.शाळेच्या चिमुकल्या विद्यार्थीनींवर शिक्षकांनीच केलेल्या लैंगिक अत्याचाराचा पोलिस दक्षता समिती कडून निषेध करण्यात आला. या घटनेबाबत 4 जुलै रोजी दक्षता समितीच्या सदस्यांनी जिल्हाधिका-यांना निवेदन देवून कठोर कारवाईची मागणी केली.
यवतमाळ येथील दर्डा एज्यकेशन सोसायटीद्वारे विद्यार्थीनींचे लैंगिक शोषण हे त्याच शाळेतील शिक्षक यांनी केले आहे. ज्या शिक्षकांच्या विश्‍वासावर पालक आपल्या पाल्यांना शिक्षण घेण्यासाठी पाठवितात अशा पवित्र शिक्षकी पेशा असलेल्या शिक्षकांकडून मानवी जीवनाला काळीमा फासणा-या या घटनेचा पोलिस दक्षता समितीतर्फे जाहीर निषेध करण्यात आला. सदर प्रकरण जलद गती न्या
यालयात सोपवून आरोपींना कठोरात कठोर शिक्षा व्हावी.  तसेच अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून शासन स्तरावर उपाययोजना करण्यात यावी, अशी मागणी दक्षता समितीच्या अध्यक्षा सौ. इंदुमती लहाने, प्रशकर वाघमारे, सौ.अंजली परांजपे, प्रशांत सोनोने, ना.है.पठाण यांनी केली आहे.