आझाद हिंद संघटनेचे आगळे वेगळे आंदोलन
रस्त्यावर खड्ड्यांमध्ये बेशरमचे झाड लावून निषेध
बुलडाणा, दि. 07 - मलकापूर शहरातील मुख्य रस्त्यांवर खड्डे पडले असून त्यात पाणी साचले आहे. त्यामुळे अपघातांना निमंत्रण दिले जात आहे. त्यामुळे पाणी हाणी होण्याची शक्यता आहे. सा.बा.विभागाच्या दुर्लक्षामुळे मोठा अपघात होण्याची शक्यता असून त्या निषेधार्त आझाद हिंद संघटनेच्य वतीने विदर्भ संघटक अजय टप यांचे नेतृत्वाखाली त्या खड्ड्यांमध्ये बेशरमचे झाड लावण्यात आले व त्याला पुष्पहार टाकून आगळा वेगळा निषेध करण्यता आला.मलकापूर येथील तहसिलचौकात बुलडाणा मुक्ताईनगर नांदुरा व स्टेशन येथून ये जा करणार्या प्रवाशांची वरदळ असते. अशा परीस्थितीत चौकातील रस्ता सुरळीत असणे गरजेचे आहे. असे असतांना विविध कामाकरीता रस्ता खोदल्यामुळे चौकात खड्डेच खड्डे पडलेले आहे. त्यांची दुुरस्ती होत नाही. यासंबंधी अनेकांनी सा.बा.विभागाकडे पाठपुरवठा केला असतांना त्यांकडे दुर्लक्ष होत आहे.तरी दुसरीकडे पावसाला सुरुवात झाली असल्यामुळे अपघाताची शक्यता वाढली आहे. त्या विषयाने आझाद हिंद संघटनेच्या वतीने अजय टप यांच्या नेतृत्वाखाली बेशरमचे झाड लावून त्यावर पुष्पहार अर्पण करुन सा.बा.विभागाला जागविण्याचा प्रयत्न करण्यात आला. यावेळी जिल्हा अध्यक्ष श्रीकृष्ण भगत, शहर अध्यक्ष शालीग्राम पाटील, जिल्हा उपाध्यक्ष रमेश माळवे, शे.इमान शे.लुकमान, शिवाजी भगत, अनिल पाटील, बळीराम बावस्कार, प्रमोद भिसे, संतोष भोगळे, संजय हुबे, शाम जाधव, शे.शकील, राहूल तायडे, मुस्ताक खान, संजय अग्रवाल यांच्यासह बहूसंख्य नागरीकांची उपस्थिती होती.
