Breaking News

स्पर्धापरीक्षेत मराठी टक्का वाढवाः खा.जाधव

बुलडाणा, दि. 07 - स्पर्धापरीक्षेच्या माध्यमातून भारतीय प्रशासकीय सेवेत  मराठी टक्का वाढवा यासाठी शिवसेनेच्यावतीने हिंदु हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आयएएस अ‍ॅकेडमीत मार्फत मार्गदर्शन दिल्या जाते. या सुविधेचा लाभ भुमिपुत्र युवक-युवतींनी  घेवून स्पर्धा परीक्षेत यश मिळवून अधिकारी व्हावे, असे आवाहन शिवसेना संपर्क प्रमुख खा.प्रतापराव जा
धव यांनी केले.
स्थानिक जनसंपर्क कार्यालयात अ‍ॅकेडमीसाठी ऑफलाईन अर्ज देण्याचा शुभारंभ खा.प्रतापराव जाधव यांच्याहस्ते करण्यात आला. यावेळी जिल्हाप्रमुख जालिंधर बुधवत, जि.प.विरोधी पक्ष नेते अशोक इंगळे, डॉ.मधुसुदन सावळे, डॉ.राहुल मेहेत्रे, गजानन धांडे, प्रकाश देशलहरा, खा. स्वीय सहायक गोपाल डिके उपस्थित होते.
हिंदु हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आयएएस अ‍ॅकेडमीसाठी ऑनलाईन व ऑफलाईन स्वरुपात अर्ज स्विकारले जातात. मुंबई येथे 1 हजार विद्यार्थ्यांना याबाबत वर्षभर तज्ज्ञाकडून मोफत मार्गदर्शन होणार आहे. यासाठी चाचणी परीक्षा सुध्दा होईल. ऑफलाईन अर्जासाठी विद्यार्थ्यांनी खा.जनसंपर्क कार्यालय व जिल्हाप्रमुख संपर्क कार्यालयातून घेवून अधिकारी होण्याचे स्वप्न पुर्ण करण्यासाठी परिश्रम घ्यावे, असेही यावेळी खा.प्रतापराव जाधव म्हणाले. कार्यक्रमाला शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.