बांगलादेशमध्ये हिंदू पुजार्याची हत्या !
ढाका, दि. 01 - हिंदू पुजार्याची हत्या केल्याची घटना शुक्रवारी समोर आल्याची माहिती बांगलादेश पोलिस आणि वरिष्ठ प्रशासकीय अधिकार्यांनी दिली. श्यामनोंदा दास (वय 45) हे राजधानी ढाकापासून 300 किलोमीटर अंतरावर झेनैदाह जिल्ह्यातील एका मंदिरात पुजारी होते. शुक्रवारी पहाटे ते फुले घेऊन नित्यपूजेला मंदिराच्या दिशेने निघाले होते. यावेळी मोटारसायकलवरून आलेल्या तीन अज्ञात युवकांनी धारदार शस्त्रांनी वार करत त्यांची हत्या केली, अशी माहिती झेनैदाह जिल्ह्यातील वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी मेहबूबर रेहमान यांनी दिली. हत्येचा प्रकार हा स्थानिक दहशतवाद्यांप्रमाणे दिसत आहे. मात्र याक्षणी काहीही अंदाज व्यक्त करता येणार नाही‘, अशी रेहमान म्हणाले. अशाच प्रकारच्या अलिकडे झालेल्या काही हत्यांची जबाबदारी आयसीस या दहशतवादी संघटनेने स्वीकारली होती.